गोतोंडी व सणसर गावात घरफोडी करणारा चोरटा वालचंदनगर पोलिसांच्या ताब्यात ; १ लाख ८७ हजार ४१० रुपयांचा ऐवज जप्त 

गोतोंडी व सणसर गावात घरफोडी करणारा चोरटा वालचंदनगर पोलिसांच्या ताब्यात ; १ लाख ८७ हजार ४१० रुपयांचा ऐवज जप्त 

इंदापूर || इंदापूर तालुक्यातील गोतोंडी व सणसर गावात मागील काही दिवसापूर्वी झालेल्या तीन घरफोड्यांचा उलगडा करण्यात वालचंदनगर पोलिसांना अखेर यश आले आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून यापैकी एकाला अटक केली आहे.नियोजन उर्फ बेड्या संदीप भोसले (वय २८, रा. सोनगाव, ता. बारामती) आणि लखन बापू उर्फ विजय काळे (वय २५, रा. आटपाडी, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या चोरट्यांची नावे आहेत. यापैकी नियोजन उर्फ बेड्या संदीप भोसले याला पोलीसांनी अटक केली आहे.

वालचंदनगर पोलिसांनी आरोपीकडून पावणेपाच तोळे सोन्याचे दागिने व ११ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ८७ हजार ४१० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला असल्याची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी दिली.

लातुरे म्हणाले की,गोतोंडी व सणसर येथे डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये तीन घरफोड्या झाल्या होत्या. गोतोंडीमधील अफसाना शेख यांच्या घरी १८ डिसेंबर २०१९ ला चोरी करून चोरट्यांनी १ लाख ३२ हजार ५६० रुपयांचा ऐवज चोरून नेला.तर २९ डिसेंबर २०१९ ला सणसर मधील मुस्तफा सय्यद यांच्या घरी चोरट्यांनी १ लाख ३२ हजार रुपयांची चोरी केली. तसेच सणसर गावातच २७ जानेवारी २०२२ ला संभाजी आडके यांचेही घरी चोरट्यांनी चोरी केली होती. यात या चोरट्यांनी ४७ हजार ८०० रुपयांचे दागिने मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज चोरी केला होता.याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांत विविध गुन्हे दाखल आहेत.वालचंदनगर पोलीस याचा तपशील करीत होते.दरम्यान भोसले याला ताब्यात घेतले असता चौकशीत त्याने सणसर व गोतोंडीमध्ये काळे याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. भोसलेकडून चोरीतील १ लाख ८७ हजार ४१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी बारामती गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, पोलीस निरीक्षक अतुल खंदारे, नितीन लकडे, सहायक फौजदार शिवाजी निकम, रवींद्र पाठमास, मोहन ठोंबरे, शैलेश स्वामी, विनोद पवार, अमर थोरात, प्रमोद भोसले, किसन बेलदार आदींच्या पथकाने केली आहे.