महागाईच्या निषेधार्थ मुळशी तालुक्यात युवासेनेचे थाळी बजाओ आंदोलन

महागाईच्या निषेधार्थ मुळशी तालुक्यात युवासेनेचे थाळी बजाओ आंदोलन

पिरंगुट || केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केंद्रातील मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुळशी तालुक्यातील युवासेनेना व शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर व युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग सचिव अविनाश बलकवडे,भोर विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद हांडे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जि.प.सदस्य शंकर मांडेकर, तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपजिल्हाधिकारी नागेश साखरे,युवा सेना तालुका प्रमुख दत्ता झोरे,संतोष तोंडे,समन्वयक मयूर भांडे,वैभव शितोळे,तालुका युवा अधिकारी राम गवारे यांच्या नेतृत्वाखाली पिरंगुट(मुळशी) येथे थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.

युवासेनाप्रमुख,पर्यावरण मंत्री आदित्य  ठाकरे,युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पिरंगुट येथे शिवसेना युवासेना मुळशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले असल्याचे मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले याच बरोबर कोरोना घालविण्यासाठी याच केंद्र सरकारने थाळी वाजविण्यासाठी सांगितले होते कदाचित या थाळी बजाव मुळे तरी महागाई कमी होईल अशी अपेक्षा काही हरकत नाही असे म्हणत ते पुढे असे ही म्हणाले की ज्या ज्या वेळी निवडणूका येतात.त्या त्यावेळी पेट्रोल दर हे कमी करण्यात येतात.निवडून आल्यानंतर पुन्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढविण्याची भूमिका घेण्याचे काम हे केंद्र सरकार वेळोवेळी करत आलेल आहे ही केवळ आणि केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे सरकार करीत आहे असे ही ते म्हणाले

महागाईने उच्चांक गाठलेला असताना सर्वसामान्य माणसाने कसं जगायचं अस मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तेव्हा वाढत्या महागाई चा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने  शिवसैनिक युवासैनिकांनी एकत्रित येत थाळी बाजाओ आंदोलन केले असल्याचे मत युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग सचिव अविनाश बलकवडे यांनी व्यक्त केले.या आनंदोलना दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी सहसंपर्क संघटिका स्वाती ढमाले,शिव सहकार सेनेचे संपर्क प्रमुख बाळासाहेब भांडे,उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, संपर्क समन्वयक कैलास मारणे,शिव सहकार सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,जेष्ठ शिवसैनिक आबासाहेब शेळके,रविकांत धुमाळ,भानुदास पानसरे,अमोल शिंदे, सूर्यकांत साखरे,सुरेश मारणे, हनुमंत सुर्वे,ज्ञानेश्वर केमसे, गोविंद सरुसे,वैभव पवळे,रणजित टेमघरे,तालुका संघटिका सुरेखा तोंडे,कांताताई पांढरे,राणी शिंदे,उपतालुकाप्रमुख अनंता वाशिवले, कालिदास शेडगे,शिवाजी जाधव,अमोल जाधव, शिवाजी भिलारे, माऊली केमसे,उपतालुका आधिकारी स्वप्निल पारखी,शुभम साखरे, माऊली चोंधे,आभिजीत नलावडे,गजानन हिरवे विभाग प्रमुख शिवाजी बलकवडे, समीर शिंदे,सागर पालवे,भुषण बुचुडे, प्रसिद्धी प्रमुख वसंत बोडके,रुपेश जाधव,गणेश जाधव,निलेश गवारे संजय साठे,दिलीप मारणे,मंगेश साठे या सह आदि शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.