ह.भ.प.मल्हारी रामचंद्र खिलारे (गुरुजी) यांचे निधन.

ह.भ.प.मल्हारी रामचंद्र खिलारे (गुरुजी) यांचे निधन.
Khilare Guruji

इंदापूर ता.24 इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील रहिवासी असलेले ह.भ.प.मल्हारी रामचंद्र खिलारे (गुरुजी) वय (८४ वर्षे) यांचे अकलुज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे दि.१९ अॉगस्ट रोजी त्यांचे निधन झाले.

मागील आठवड्यामध्ये त्यांना न्यूमोनिया या आजाराने ग्रासले होते.दरम्यान त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला असता.त्यांची अँटिजेन रॅपिड टेस्ट करण्यात यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असता त्यांना पुढील उपचाराकरिता अकलुज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तब्बल सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.परंतु अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड होवून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तसेच मागील दहा वर्षापूर्वी त्यांच्यावर अँजोप्लास्टी करण्यात आली होती.या बसविण्यात आलेल्या टेन्टची मुदत आँक्टोंबर महिन्यामध्ये संपणार होती.त्याचबरोबर त्यांना उच्च रक्तदाब,दमा,साखर यासारखे आजार त्यांना होते.

मल्हारी खिलारे (गुरुजी) यांनी खडतर परिस्थितीमध्ये आई-वडील अशिक्षित असतानासुद्धा त्याकाळी शिक्षण घेवून गुरुजी ही पदवी घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  शिक्षक म्हणून नोकरी केली.त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केले.ते सुरुवातीला २५ वर्षापासून शिक्षक नोकरीकरिता सर्व कुटुंब पिटकेश्वर येथे राहवयास होते.तालुक्यातील पिटकेश्वर पंचक्रोशीत न्याय निवाड्यासाठी ते प्रसिद्ध होते. तब्बल पाच दशकं त्यांनी आपल्या स्वभावाने लोकांच्या मनावर अधिराज्य केले होते.

त्याचबरोबर आपल्या दोन्ही मुला-मुलींना उच्चशिक्षित केले.त्यांनाही उच्चपदी नोकरीला लावले.त्याचबरोबर दोन लहान भाऊ यांना उच्चपदी सरकारी नोकरदार बनवले.त्यानंतर सेवानिवृत्तीस काही वर्ष बाकी असताना ते कुटुंबासह तालुक्यातील तरंगवाडी येथे स्थायिक झाले.ते याठिकाणचे रहिवाशी झाले.त्यांना सुरुवातीपासूनच वारकरी सांप्रदायाची आवड होती.त्यांना वाचनाची, गायनाची आवड होती. त्यांचे अनेक अभंग,गौळणी, चालीरितीसह तोंडपाठ होत्या. घराण्याचा वारकरी सांप्रदायाचा वारसा पुढे असाच सुरु रहावा याकरिता त्यांनी तरंगवाडी-गोखळी या दोन गावांची एकत्रित मिळून रामकृष्ण हरी सांप्रदायिक पायी दिंडीची स्थापना केली.श्री.संत तुकाराम पायी पालखी सोहळ्यामध्ये गेली पंचवीस वर्षापासून दिंडी सोहळ्यात दिंडी घेवून सहभागी होत देहू-पंढरपूर पायी प्रवास करीत होते. समाजातील सर्व घटकांना त्यांनी या तयार केलेल्या दिंडीमध्ये आदराचे स्थान दिले. गेली २५ वर्षापासून ही सेवा ते करत होते.यावर्षी कोरोनामुळे पायी दिंडी सोहळा रद्द झाल्याने यावर्षी पायी सोहळा त्यांनी केला नाही. 

याबरोबरच त्यांनी तरंगवाडी या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरु करण्याकरिता त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.त्यांनी रुजवलेली ही परंपरा गेली २० वर्षापासून आजही सुरु आहे.ते सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाहेर चलन लिहिण्याचे काम केले.कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये त्यांचे हे काम बंद होते. त्यांनी  निराधार,विधवा महिला यांना सरकारी योजनेचे लाभ मिळण्यासाठी ते धडपड करत होते.अनेक निराधारांना आधार देण्याचे काम आजतागायत ते करत होते. त्यांची तालुक्यातील,जिल्ह्यातील अनेक कुटुंबाशी  नाळ जोडली गेली होती.त्यांच्या या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.